प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी नगरपरिषद च्या वतीने आज १३ आॕक्टोबर आतंरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न*
यावेळी नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी)
आरोग्य सभापती संजय कैगार ,जेष्ठ नगरसेवक मामा जाधव, राजु आलासे, उपस्थित होते कार्यक्रम दरम्यान इचलकरंजी नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभाग कडुन आपत्ती काळी वापरण्यात येणाऱ्या कार्यप्रणाली साहित्यची माहिती देऊन प्रत्यक्ष आगप्रतिबंधक उपकरणे,विविध अत्यावश्यक गाठीचे प्रकार (बेल नाॅट्स), इमर्जंन्सी फायर लाईट लॅम्प, फायर इक्सटिंग्यूशर, फायर इक्सटिंग्यूशर बाॅल, कटर मशीन फायर बुलेट आणि इक्विपमेंट्स आदींची प्रात्यक्षिक करण्यात आले.
तसेच यावेळी विविध रेस्कु फौर्स मधील आपत्ती व्यवस्थापन दरम्यान सर्व उत्कुष्ठ कामगिरी बजावण्यार्या जवानाचा नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी व मान्यवर हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी
इचलकरंजी नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभाग चे संजय कांबळेसह जवान आधिकारी कर्मचारी उद्यान प्रमुख संपत चव्हाण,नगरपरिषद अधिकारी वाहन विभाग अधिकारी कर्मचारी नगरपरिषद अग्निशमन दलाचे जवान, यांत्रीक बोटीवरील जवान,आधार रेस्क्यु फोर्स टाकवडे, तेजोनिधी रेस्क्यु फोर्स, वीर सेवा रेस्क्यु फोर्स,सह्याद्री रेस्क्यु फोर्स कागल, उपस्थित होते.