प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी प्रतिनिधी :श्रीकांत कांबळे:
तारदाळ शहापूर रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या प्रवासाची व वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या असून.गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वी सदर रस्त्याचे काम करण्यात आले होते.परंतू सहा महिन्याच्या आतच सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्या मुळे खड्डे चुकवताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खडी उचकटून आजूबाजूला पडत आहे.
या बाबतचे वृत्त सा.प्रेस मीडियाने *तारदाळ शहापूर रस्त्याची दुरावस्था*#अशी बातमी प्रसारित केली होती.या बातमीने रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात झाली असून त्यामुळे स्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवासी वाहनधारक व नागरिकतून समाधान व्यक्त करण्यात येत असून प्रेस मीडियाचे सर्वांनी आभार मानले.
Tags
इचलकरंजी