दि.२/१०/२०२
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज शनिवार दि.२ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी चौक येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त नगरपरिषद सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल , नगरसेवक शशांक बावचकर, संजय कांबळे, उप मुख्य अधिकारी केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे,
जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे,शितल पाटील,सदाशिव शिंदे,अविनाश मोरे, सुभाष आवळे, दिपक खोत, भारत कोपार्डे ,सचिन शेडबाळे , दिलीप मगदूम आदी अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.