आम्हाला या वेळी तर दिवाळी साजरी करून द्या... राजकुमार गजगे व नाना दातार .





प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी.. आनंदा शिंदे : 

इचलकरंजी : आम्हाला या वेळी तर दिवाळी साजरी करून ध्या.राजकुमार गजगे व नाना दातार यांची जोरदार मागणी केली .प्रत्यके वर्षी दिव्यांगनान शासन निर्णय नुसार मिळणार अनुदान धोषित केला जातो परंतु आम्हाला तो वेळेत मिळतच नाही. आलेला निधी इचलकरंजी नगरपालिका इतर विविध खाते मध्ये वर्ग करण्यात येतो, तो निधी दिव्यांगनाचे लाभार्थी यांना वेळेत मिळत नाही ही आमच्या नगरपालिकाचे कमाल मानावी लागेलं.

आम्हाला एक वर्ष असे गेले नाही की आम्ही सर्व दिव्यांगाना सोबत घेऊन नगरपालिकाचा प्रवेशद्वार समोर आमचा राखीव निधी लवकर मिळत नाही म्हणून आंदोलन करावे लागते मग कोठेतरी प्रशासनाला जाग येते.आम्ही दिव्यांग असून सुद्धा नगरपालिकच्या घर फळा पाणी पट्टी वेळेत भरून सुध्दा आमच्या हाकाचा निधी वेळेत मिळत नाही. कोल्हापूर जिल्हा महानगरपालिका दिव्यांग विभाग मार्फत उन्नती अभियानांतर्गत जाते हे साहित्य महिला बालकल्याण विभाग (दिव्यांग विभाग)कडे धूळ खात पडलेली आहे दिव्यांग विभागीय आयुक्त जाणून बुजून दुर्लक्ष करतात  यालाच म्हणतात .(अधांळ दळते आणि कुत्रे पीठ) खातें अशी गत या विभागांची झाली आहे.

साखळी उपोषणच्या दुसरा दिवस सुरू असताना इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ अलंका स्वामी बरोबर नगरसेवक विठ्ठल चोपडे अशोक स्वामी आंदोलनाच्या ठिकाणी आले या वेळी अशोक स्वामी  म्हणाले की सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्य नगर विकास मंत्र्यांच्या बरोबर ऑनलाईन मिटिंग मध्ये   नगरारध्यक्ष सौ.अलका स्वामी वहिनी आपले मत मांडत असताना खासदार धर्यशील माने (दादा) यांचा फोन अशोक स्वामीना आला असताना लगेच अशोक स्वामी यानी  दिव्यांगांचा  विषय आपल्या नगर विकास मंत्री यांच्या बरोबर होणाऱ्या मिटिंग मध्ये मांडण्यास स्वामी यांनी विनंती केली.

इचलकरंजी नगरपालिका चे मुख्य अधिकारी दोन दिवस करीता बाहेर गावी गेल्यामुळे आपण अधिकारी आल्यावर त्यांच्या बरोबर चर्चा करून आपल्या निधीचा प्रश्न मार्गी लावू असे सांगून आपण उपोषण मागे घ्यावे अशी  विनंती  करण्यात आली  माझ्या बरोबर नगरध्यक्षचा दालनात दिव्यांग प्रतिनिधी यांना बोलण्यात आले व  या वर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया असे शेवटी  निर्णय घेण्यात आला..


"""""'''''’”"""""""'''''''''"""""""""""""""''"'"""

दिव्यांग विभागच्या जाधव मॅडम  दिव्यांगना गुलाम समजतात दिव्यांगाणे  नीट वागणूक देत नाहीत व्यवस्थीत उत्तरे देत नाहीत. या बाबत अगोदर  तक्रार देखील केली आहे परंतु कारवाई काही  करण्यात आले नाही. या वेळी जाधव मॅडम वर कारवाई झाली नाही तर लोकशाही पद्धतीने  मानवी हक्क आयोग नवी दिल्ली येथे जाधव मॅडमच्या विरोधा मध्ये तक्रार करावी लागेलयाची नोंद घ्यावी असे शेवटी राजकुमार गजगे व नाना दातार म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post