प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : श्रीकांत कांबळे :
इचलकरंजी शहरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
इचलकरंजी नगरपालिकेकडे अनेक वेळा तोंडी तक्रार करुन ही खड्डे मुजविले जात नाहीत तथापि ये-जा करणारे नागरिक वयस्कर लोकाची मोठी संख्या शहरात जास्त आहे नगरपालिकेने जे फुटपाथ बांधलेले आहेत त्यावर अतिक्रमण झाले असल्यामुळे नागरिकांना ये जा करणे अवघड झाले आहे तसेच नागरिकांना स्वच्छ हवा मिळण्यासाठी फुटपाथ वरील अतिक्रमण हटविण्यात यावे त्यामुळे वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी मदत होईल याची नगरपालिकीने दक्षता घ्यावी तेव्हा नगरपालिकेने रस्त्यावरील खड्डे ताबडतोब मुजवून घ्यावे अन्यथाअपघात झाल्यास त्यास नगरपालिकेचे खातेप्रमुख व आधिकारी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी असे निवेदन ऑल इंडिया ह्यूमन राइट्सचे कोल्हापुर जिल्हा प्रमुख दत्ता मांजरे नागेश कॅदगी श्रीकांत कांबळे सुनिल पुजारी राणी कांबळे विजय लोढ्ढे यांनी दिले