प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : येथील डेक्कन को ओप स्पिनिंग मिल नामांकित संस्था बंद पडून ही संस्था डी आर टी पुणे मार्फत विक्री करून आज १६ ते १७ वर्ष झाली झाली असून परंतु मिल च्या कामगारांना अद्याप पूर्ण पणे हिशोब , त्यांच्या हक्काचे देय रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. गेल्या १६ ते १७ वर्ष झाली कामगार या कोर्टातून त्या कोर्टात चक्राच मारत आहेत.
दि डेक्कन को ओप सूतगिरणी कामगार सेवा संघ इचलकरंजी ही संस्था नोंदनीकृत असून या संघटनेने अगदी तळा गाळात जाऊन सोसायटी व प्रो.फंड ची रकमेची फाईल उघड करून त्या संबंधी कागद पत्रे उपलब्ध करून घेतलेली आहेत. व त्या आधारे वेग वेगळ्या न्यायालयात या संबंध केसेस चालू आहेत.या बाबत डेक्कन गिरणी च्या जुन्या कामगारांना संघटने मार्फत कळविण्यात येते की आपल्या संघटने मार्फत आपणाकडून लागणारे कागदपत्रक ,आधारकार्ड, कामाचा पुरावा जमा करून घेणेचे काम सुरू असून आपण लवकरात लवकर आपले कागद पत्रे संघटनेच्या कार्यालयात जमा करावेत, कागद पत्रे जमा न केल्यास होणाऱ्या परिणामाला संघटना जबाबदार राहणार नाही असे आवाहन डेक्कन को ओप सुत गिरणी सेवा निवृत्त कामगार संघ इचलकरंजी अध्यक्ष मचिंद्र राजेन्द्र पवार यांनी केले आहे.