प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : होऊन गेलेल्या वर्षाचे 2020 , 2021 चे राहिलेले अंदाजे 320 अपंग बांधवांचे आणि चालू वर्षाचा पाच टक्के निधी जाहीर केलेल्या बजेट मध्ये अंदाजे एक कोठी पंधरा लाख देण्याचे जाहीर केले आहे , आणि 320 लोकांचे राहिलेला पाच टक्के दिवाळीच्या अगोदर देण्यात यावे अन्यथा अचानक आमरण उपोषणा व आंदोलन करण्यात येईल व याची पुर्ण जबाबदारी आपली राहील शिवाय अपंगाना दुखापत झाल्यास याची जबाबदारी मुख्याधिकारी सह , नगरसेवक , नगरसेविका राहतील असे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनावर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष , कार्याध्यक्ष , उपाध्यक्ष , महिला अध्येक्ष यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.