प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता. ५, समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालया मध्ये मराठीतील थोर विनोदी ,ग्रामीण कथाकार आणि कथा कथनकार द.मा.मिरासदार यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
द.मा.मिरासदार शनिवार ता.२ ऑक्टोबर २१रोजी वयाच्या चौऱ्याण्णाव्या वर्षी कालवश झाले.त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले आहे.हे प्रदर्शन वाचनालयाच्या ग्रंथ देवघेव विभागाच्या वेळेत गुरुवार ( ७ ऑक्टोबर ) अखेर सुरू राहील. या प्रदर्शनाला साहित्य रसिकांनी भेट द्यावी. तसेच या वाचनालयातील एकोणतीस हजार ग्रंथसंग्रहाचा व वाचनसाहित्याचा लाभ अबालवृद्ध वाचन रसिकांनी घ्यावा असे आवाहन प्रबोधन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.