प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : चूल आणि मूल' म्हणजे स्त्री अशीच कल्पना समाजात पिढयानपिढ्या रूढ झाली होती. मात्र जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर स्त्रीयांनी सर्वच क्षेत्रात गगनभरारी घेऊन समाजात आपली प्रतिमा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा, शिक्षण, समाजकारण आणि राजकारणतही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. हा सर्व व्याप सांभाळताना संसाराकडे पर्यायाने आपल्या मुलांच्या संगोपन आणि शिक्षणाकडे तितकेच कटाकाक्षाने त्या लक्ष देतात. आई, पत्नी, बहीण, मुलगी अशा सर्वच भुमिका त्या अत्यंत लिलया पार पाडतात. अशा कार्यकर्तृत्वान महिलांचा आदर आणि सन्मान करणे, त्यांच्या कार्याचा गौरव सन्मानर्थ नवरात्री औच्युत साधत नऊ दिवस दररोज ३,५,१०, कि.मी अंतराचे नवदुर्गा रन उपक्रम चे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचा शुभारंम आज नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी( वहिनी ) व अप्पर पोलिस अधिक्षक मा जयश्री गायकवाड यांनी नवदुर्गा रन ज्योत प्रजवलीत करुन नवदुर्गा रन मध्ये सहभागी होत रन उपक्रमाला सुरुवात केली.
या वेळी रिंगण फिटनेस फौडेशन अध्यक्ष, पदधिकारी , पत्रकार ,युवक, युवती, महिला, जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात रन मध्ये सहभागी झाले होते.
रिंगण नवदुर्गा रन' या उपक्रमातील पहिल्या दिवसाचे म्हणजे गुरुवार ७ आॕक्टोबर आई.. जिच्या रूपातून साक्षात एक दिव्यशक्ती सदैव आपल्या पाठीशी असते... जी सदा सर्वकाळ आपल्या कल्याणाचाच विचार करीत असते... जी नऊ महिने उदरात सांभाळ करून आपल्याला जन्म देते.... जी अनेक आव्हाने पेलत आपल्याला लहानाचं मोठं करते..... जिच्या ध्यानी-मनी नेहमीआपलाच विचार असतो.... कितीही मोठे झालो तरी जिच्या कुशीत शिरुन आपण लहान होतो.... आजची पहिली रन समर्पित करूया आपण आपल्या आईला.