प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी वार्ताहर :-
आज शनिवार दिनांक 2 ऑक्टोंबर 2021. रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री या दोन महान राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त आपल्या ॲक्टिव ग्रुप च्या वतीने इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आपल्या ग्रुपचे अध्यक्षा सौ.गीता भागवत मॅडम यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीअर मॅडम यांनी केले.व मनोगत श्री मुरतले सर यांनी केले. तसेच आपल्या ग्रुपमध्ये दोन नवीन सदस्यांचे स्वागत श्री राम आडकी त्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊन श्री भीमराव पवार सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले व सौ दिपाली लोकरे यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत ग्रुपच्या अध्यक्षा गीत भागवत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित संजीवनी चिंगळे मॅडम, अमिता बिरंजे, कविता शिंगाडे, अनिता माने, संजीवनी हरिअर, राखी मुरतले, सरिता पांडव, माधवी करांगळे, या कार्यक्रमाचे भार श्री लक्ष्मण पाटील सर, यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन अमिता बिरंजे मॅडम यांनी केले.