भारतीय राष्ट्रीय मानवाधिका पार्टी कोल्हापूर जिल्हा व संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम ) महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.




हातकणंगले तालुका प्रतिनिधी: आप्पासाहेब भोसले:                       

 भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, कोल्हापूर जिल्हा यांचे मार्फत व संपदा ग्रामीण महिला संस्था(संग्राम) यांचे सहकार्याने रविवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करणेत आले होते. विचारे माळ येथील श्री हनुमान फ्रेंड सर्कल हाॅल मधे सकाळी १२ ते संध्याकाळी ५ पर्यंत नागरिकांची आरोग्य तपासणी करणेत आली. या शिबिरा मधे महिलांच्या आरोग्य, समस्यां विषयी तपासणी व मार्गदर्शन करणेत आले.सदर योजनेचा लाभ घेणे साठी भागातील नागरिकांनी गर्दी केली होती. दु १२ ते सायं. ५ पर्यंत ८३ नागरिकांची तपासणी करणेत आली. सदर चे शिबिर श्री. विशाल पाटोळे, सरचिटणीस(महाराष्ट्र) व मा. श्री. शाम जाधव साहेब, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा, यांचे अध्यक्षते खाली तसेच श्रीमती लता पैठणकर (अध्यक्ष, कोल्हापूर शहर महिला आघाडी)  यांचे नियोजनाने संपन्न झाले. सदर शिबिरासाठी साै. सपना भोसले (उपाध्यक्ष, कोल्हापूर शहर महिला आघाडी) यांचे विशेष सहकार्य लाभले. 

        सदरचे शिबिर भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी (कोल्हापूर जिल्हा) च्या सर्व पदाधिका-यांच्या सहकार्याने उत्तम रित्या संपन्न झाले. या कार्यक्रमास श्री. वसंत पुजारी (उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा), श्री. आषिश लाेंढे (अध्यक्ष, कोल्हापूर शहर), श्री. ताैसिफ सोलापुरे (अध्यक्ष, कोल्हापूर शहर अल्पसंख्यक आघाडी), श्री. किशोर नितनवरे, कु. ओमकार जाधव, साै. कोमल किशोर नितनवरे इ. उपस्थित होते.

    संपदा ग्रामीण महिला संस्थेचे(संग्राम) मान. अफजल बारस्कर, मान. सुदर्शन निगडे, मान. साधना कांबळे, मान. जयश्री शितलगिरी, डाॅ. ए. आय. कुंभार, सुवर्णा चॅटर्जी व पदाधिकारी उपस्थित होते.

    तसेच सदर शिबिरास माननीय संतोष उर्फ किरण महाजन (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी आघाडी) व श्री. सुयश सुतार (उपाध्यक्ष हातकणंगले तालुका) यांची विशेष उपस्थिती लाभली. 

     सदरचे शिबिर उत्कृष्टरित्या पार पाडणे साठी सहकार्य केले बद्दल सर्व भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी ( जिल्हा कोल्हापूर) चे पदाधिकारी, संपदा ग्रामीण महिला संस्था यांचे अधिकारी, पदाधिकारी व भागातील नागरिक यांचे आभार व धन्यवाद. तसेच माननीय संतोष उर्फ किरण महाजन (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तृ. आ.) यांचे उपस्थित राहिले बद्दल आभार व धन्यवाद...

श्री. विशाल पाटोळे,

(सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य)यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post