त्यांच्या या यशाने वस्त्रनगरीच्या यशाच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
हातकणंगले ता. प्रतिनिधी :— आप्पासाहेब भोसले
वस्त्रनगरीतील सौ.ज्योती प्रमोद पाटील यांनी विविध कौशल्य आत्मसात करत सौंदर्यवती स्पर्धेत वेगळा ठसा उमटवला आहे. याशिवाय कला व अभिनय अशा क्षेत्रात देखील विविध प्रयोग करत आपले कौशल्य सिध्द करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. नुकताच पुण्यात झालेल्या कस्तुरी महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी महा प्रतियोगिता स्पर्धेत राज्यभरातून वीस स्पर्धक सहभागी झाले होते.यातील रुपेरी गटामध्ये
वस्त्रनगरीतील सौ.ज्योती प्रमोद पाटील या विजेत्या ठरल्या. यावेळी प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी ,अभिनेत्री श्रेया बुगडे ,विनोदी अभिनेते पँडी कांबळे ,अभिनेत्री राधिका पाटील यांच्या हस्ते सौ.ज्योती पाटील यांना महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी किताब देवून सन्मानित करण्यात आले.
या वेळी ई न्यूजचे डायरेक्टर रविंद्र वारडे ,विजया मानमोडे ,चारुशीला देशमुख ,अभिजीत मानमोडे ,प्रशिक्षक मयुरेश महाजन ,रणजित सावंत ,ज्योत्स्नाराजे गायकवाड ,डॉ. स्वाती पाडोले ,लोककवी प्रशांत मोरे ,गौरी भडांगे ,मेकअप पार्टनर वैशाली भागोडिया ,सेलिब्रिटी हेअरड्रेसर नफिसा लोखंडवाला यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ,महिला ,युवती उपस्थित होत्या.