प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
देहूरोड शहर विभाग अल्पसंख्याक अध्यक्ष शंकर स्वामी राष्ट्रवादी काँग्रेस, यांनी विविविध प्रकारच्या मागण्यांसाठी नवाब मलिक मंत्री अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य यांना पत्रक दिले आहे अशी माहिती फरहत अत्तार यांनी प्रेस मीडियाला दिली . देहूरोड स्थितीत जामा मस्जिद देहूरोड येथील बरखास्त असलेली ट्रस्ट विषयी एडॉब,कॅमेटी किंवा निवडणूक पध्दतीने लवकरात लवकर वक्फ मंडळ मार्फत निर्णय करण्यात यावा.
देहूरोड जमा मस्जिद येथे झालेले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपास करण्यात यावा. अशी मागणी पत्रकाद्वारे केली आहे, देहूरोड येथील हायवे वर असलेली मुस्लीम दफन भूमी दुरुस्ती करणे बाबत, त्यामध्ये सौरक्षण भिंत याचे काम प्रामुख्याणे करण्याची गरज आहे. विदुत्व दिवे,दफनभूमी अंतर्गत रस्ते,व सुशोभिकरण लवकरात लवकर करण्यात यावे
पि.चि. हद्दीतील विकास नगर, साईनगर, श्री कृष्णा नगर, एम.बी कॅम्प इत्यादी भागात मोठ्या प्रमाणे मुस्लीम लोकसंख्या वाढल्याने तेथील लोकांसाठी राज्य शासनामार्फत दफन मंजुरी करण्यात यावे.असे ही पत्रकात नमूद करण्यात आले आहे,
जामा मस्जिद देहूरोड जागा खरेदी व मस्जिद बांधण्यात यावे.व मुस्लीम बहुल संख्याक असलेल्या लोक वस्तीत शौचालय, रास्ते,पंथ दिवे यांच्या दूर अवस्था.झालेली आहे त्यांना तत्काळ दुरुस्तीसाठी आदेश देण्यात यावे,
अल्पसंख्याक / मुस्लीम समाज हा अल्प संख्येत असून सुद्धा बहू संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व कॉंग्रेस पक्ष सारखे धर्मनिरपेक्ष पक्षांना आपला पक्ष मानणारा व मतदान करणारा समाज आहे, पण आर्थिक व शैक्षणिक दुष्टिकोनातून फार मागे राहिलेला आहे. म्हणून समाजाला सक्षम करण्यासाठी शासनाचे विविध योजना राबविण्यात यावे व लोकांपर्यंत पोहचणे व त्यांचा लाभ अल्प संख्यकांना मिळण्यात यावा. या साठी काही प्रमाणात पक्षाच्या मार्फत व काही प्रमाणात शासनाच्या मार्फत याची दाखल घेऊन काम करण्याची आज काळाची गरज आहे ,त्यावेळी शंकर स्वामी ,इम्रान शेख ,फरहत अत्तार, आदि मान्यवर उपस्थित होते,