ईद-ए-मिलादुन्नबी पवित्र दिन म्हणजे मानवतेचा महान संदेश देणारा आहे.

 ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहूरोड शहर


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहूरोड शहर,व मावळ तालुका,च्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त खिर वाटप सायंकाळी सात  वाजता करण्यात आला,

ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन जनसंपर्क कार्यालय जवळ हा कार्यक्रम करण्यात आला, ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी चौधरी,बोधिसत्व जनजागृती संघ अध्यक्षा संगीताताई वाघमारे, यांच्या हस्ते खिर वाटप करण्यात आले, यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, पत्रकार चंद्रशेखर पात्रे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना देहूरोड शहराध्यक्ष मलिक शेख, व कार्यकर्ते, तसेच मदद फाउंडेशन देहूरोड चे पद अधिकारी  गौस सुनार,फरहत अत्तार, अब्बास शेख , उपस्थित होते,

परशुराम दोडमनी, हुमान राइट्स असोसिएशन देहूरोड शहराध्यक्ष विजय पवार, यांनी सुत्रसंचलन केले, मावळ तालुका उपाध्यक्ष रज्जाक शेख, देहूरोड शहर उपाध्यक्ष दिपक मधुरकर, जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोगदंड ,यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते,विजय लोंढे, धर्मपाल कांबळे , श्याम चौहान,नागनाथ मधुरकर, सुमित गायकवाड, विजय निकाळजे, शाहिद शेख, सागर लांगे, भीम आर्मी देहूरोड शहराध्यक्ष प्रकाश म्हसे,नुरूल हसन खान, 

आणि प्रेस मीडिया चे पिंपरी चिंचवड चे प्रतिबिधी अन्वर अली शेख यांनी ही  कार्यक्रमाला हजेरी लावली ,मावळ तालुका उपाध्यक्ष रज्जाक शेख यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली,ईद-ए-मिलादुन्नबी पवित्र दिन म्हणजे मानवतेचा महान संदेश देणार हजरत मोहम्मद पैगंबर या महामानवाचा जयंती दिन हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मुस्लिम धर्माची स्थापना करून त्यांनी प्रत्येक मुस्लिम बांधवाने आपल्या जीवनात कसे आचरण करावे. याचा मानवतावादी संदेश पवित्र कुराण ग्रंथांत दिला आहे. त्या पवित्र कुराणात  हजरत मोहम्मद पैगंबर यांचा दिलेला संदेश प्रत्येकांने आचरणात आणला तर  ती व्यक्ती कधीही दुराचारी मार्गावर जाणार  नाही.असे महान शिकवण हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिली आहे.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post