दत्तवाड मध्ये काँक्रेट रस्त्याच्या विकास कामाचा शुभारंभ

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

  दत्तवाड : प्रतिनिधी :

जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वश्री दिवंगत नेते बंडा आप्पा माने व जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय प्रवीण माने यांच्या जिल्हा परिषद निधीतून दलित वस्ती सुधारणा योजनेमधून दलित वस्ती साठी 40 लाखाची निधी विविध विकास कामासाठी मंजूर झाला असून यामधून पाच लाख हाय मॅक्स दिव्या साठी व रस्त्याच्या आणि गटारीच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे याच पार्श्वभूमीवर दत्तवाड मधील चर्मकार समाजामधील विठ्ठल मंदिर ते राजाराम धुमाळे यांच्या घरापर्यंत दहा लाखाच्या निधीतून   काँक्रीट रस्त्याच्या विकास कामाचा शुभारंभ सरपंच श्री चंद्रकांत कांबळे व उपसरपंच श्री नाना नेजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला.

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते दौलतराव माने ग्रामपंचायत सदस्य नूर काले संजय पाटील रावसाहेब पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तानाजी मोहिते सरकार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली होती मंजूर झालेल्या 40 लाखाच्या निधी मधील रकमेतून 1000000 नवे दानवाड च्या रस्त्याच्या विकास कामासाठी व टाकळीवाडी पाच लाख निधीमधून रस्ता कामासाठी तसेच राजापूर करता गटार कामासाठी आणि पाच लाख घोसरवाड च्या रस्त्याच्या कामा करिता जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृहमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून चाळीस लाखाचे निधी मंजूर झाला आहे या विविध विकास कामासाठी तालुक्याचे नेते उद्यान पंडित माननीय श्री गणपतराव दादा पाटील यांच्या कृपाशीर्वादाने मंजूर झालेल्या निधीतून दत्तवाड घोसरवाड नवे दानवाड टाकळीवाडी व राजापूर अशा विविध गावासाठी विकास कामाला गती मिळालेली आहे  चर्मकार समाजामधील रस्त्याच्या विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते एन एस पाटील ग्रामपंचायत सदस्य बाबुराव पवार सुरेश पाटील बाळगूनावर महाराष्ट्र राज्य प्रवासी महासंघाचे जिल्हा सदस्य शिवगोंडा पाटील जितेंद्र दावने दादा पोवाडी सागर कोळी व संजय पुजारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दतवाड होऊन संजय सुतार

Post a Comment

Previous Post Next Post