प्रेस मीडिया वृत्तसेवा :
बारामती - राज्यातील साखर कारखाण्याची अवस्था बिकट आहे. महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने अडचणीत आलेले आहेत. विरोधक आम्ही खाजगी कारखान्याचे समर्थक, पाठीराखे आहोत. अश्या वलगणा करतात.आजही काही जण पाहणी करण्यासाठी जातात आणि काहीही बोलतात. काही दिवसांपूर्वी पारनेर च्या कारखान्या संदर्भात माझ्यावर आणि पवार साहेबांवर चुकीचे आरोप लावले जातात यात काही तथ्य नाही यात पवार साहेबांचा आणि माझा कुठलाही कसुभर सुद्धा संबंध नाही. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
तसेच, ते पुढे म्हणले की… माझी खासदार नानासाहेब नवले यांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून तो कारखाना स्वतःसाठी खरेदी केलेला आहे. भाजपच्या काळात तो कारखाना त्यांच्याच प्रशासनाने विक्रीसाठी काढलेला आहे. अशी सर्व परिस्थिती असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते बारामतीत सोमेश्वर साखर कारखाना निवडणूकीच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते.
अजित पवार यांचा विरोधकांना अप्रत्यक्ष धमकीवजा इशारा…
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी झाली पाहिजे आता विरोधकातील काही हौसे, गवसे, नवसे यांनी पॅनल उभा केला आहे. मात्र त्यांनी पुणे मार्केट कमिटीत काय दिवा लावला आहे. तुम्हाला माहीत नाही त्याचे जर बाहेर काढले तर अवघड होईल असा अप्रत्यक्ष धमकीवजा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे विरोधी पॅनलचे प्रमुख आणि माझी पुणे मार्केटचे सभापती दिलीप खैरे यांना दिलाय.