प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे दि ९ ;सहकारनगर नागरिक मंचाच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये सहकारनगर भाग दोन ते स्वारगेट या मार्गावर बससेवा उपलब्ध व्हावी, अशी नागरिकांनी मागणी केली होती. ही सेवा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या अंतर्गत सहकारनगर भागातील नागरिकांना अवघ्या 5 रुपयांत प्रवास करता येणार आहे. सकाळी 6:15 वाजता पहिली बस सुरू होईल, त्यानंतर प्रत्येक 40 मिनिटाला ही सेवा उपलब्ध असेल.
पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजेच पुण्याची लाइफलाइन असलेली “पीएमपीएमएल’ बससेवा आता पद्मावती, सहकारनगर परिसरातील नागरिकांना केवळ पाच रुपयांत उपलब्ध होणार आहे. नगरसेवक महेश वाबळे यांच्या प्रयत्नातून या सेवेचा शुभारंभ महापौर मुरलीधर मोहोळ, पीएमपीएलचे दत्तात्रय झेंडे यांच्या उपस्थित झाल्याची माहिती वाबळे यांनी दिली.