प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुरगूड : राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळय़ाचे आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कायमची प्रवेशबंदी करण्याचा ठराव कागल तालुक्यातील मुरगूड नगरपालिकेत करण्यात आला आहे.दुसरीकडे सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास मुंबईत त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा शहर व जिल्हा कृती समितीने दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी गेल्या आठवडय़ात मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचा आरोप केला. त्यानंतर या आरोपावर तक्रार देण्यासाठी त्यांनी कोल्हापूर जिह्यात येण्याची घोषणा केली, पण त्याला मोठा विरोध झाला. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा इशारा दिला. यामुळे जिह्यातील वातावरण बिघडू नये म्हणून प्रशासनाने सोमय्या यांना कराडमध्येच अडवले. आता आपण मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी पुन्हा कोल्हापूर जिह्याच्या दौऱयावर येणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.