पनवेल तालुक्यातील कासप या गावातील माजी सैनिक कै. रघुनाथ माळी यांचे अल्पशा आजाराने निधन .

 




प्रेस मीडिया वृत्तसेवा :  सुनील पाटील:

 पनवेल तालुक्यातील कासप या गावातील माजी सैनिक कै. रघुनाथ माळी यांचे अल्पशा आजाराने निधन पनवेल तालुक्यातील रसायनी पाताळगंगा परिसरातील कार्यकर्ते श्री किरण रघुनाथ माळी यांचे वडील माजी सैनिक कै. रघुनाथ नामदेव माळी यांचे अनंत चतुर्थीला अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांनी युद्धात देशासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे .त्यांच्या पार्थिवावर तिरंग्यात कासप या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या वेळी जय जवान जय किसान भारत माता की जय अशा घोषणां देण्यात आल्या .श्री किरण माळी यांचे वडील मिलिटरी सैनिक होते त्यांच्या वयाच्या 82 व्या वर्षी अनंत चतुर्थीला अल्पशा आजाराने निधन झाले .ते सण 1965 ते  1975 च्या देशा विरोधातील युद्धात महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्याने युद्धात अनेकांचा खात्मा केला आहे त्यांच्या आई-वडिलांनी मला देश सेवेसाठी अर्पण केल्याचे ते त्यावेळी ते इतरांना सांगत असत त्यांनी  20 वर्षापेक्षा अधिक काल देश सेवा केल्याचे समजते ते अष्टपैलू होते लाटी काटी नेमबाजी दानपट्टा चालविण्यात शातिर होते तर जवळपास एक किलोमीटर हातावर चालणे यांची सवय झाली होती. 

भारत देशासाठी माझा स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण मी शेवटचा श्वास असेपर्यंत विरोधकांना सळो की पळो करीन या विषयावर ते ठाम असायचे माळी यांचे निधनाचे वृत समजताच परिसरातील सर्व पक्ष कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती माळी परिवार हा मोठा असून कै. रघुनाथ माळी यांना सात बहिणी व एक भाऊ आहे व त्यांचा भाचे परिवार 60 ते 70 एवढा मोठा असून खूप घरंदाज आहेत व त्यांचे भाचे काही इन्कम टॅक्स अधिकारी व पोलिस अधिकारी आहेत त्यांच्या पार्थिवावर तिरंगा टाकून कासब गाव ते कासब स्मशानभूमी पर्यन्त  अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी स्मशानभूमीवर माळी यांना श्रद्धांजली देऊन त्यांनी केलेल्या कार्याच्या गुणगान गाऊन भारत देशासाठी महत्त्वाची कामगिरी केल्याचे सांगितले .यावेळी तिरंग्याला सलाम देत भारत माते की जय ,जय जवान, जय किसान असा नारा देत रघुनाथ नामदेव माळी या देश सेवकाला अखेरचा निरोप दिला.

Post a Comment

Previous Post Next Post