प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ (प्रतिनिधी):
शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी निकाल आणि प्लेसमेंट मध्ये उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली आहे. याझाकी प्राइवेट लिमिटेड वाघोली पुणे या कंपनीमध्ये कॉम्प्युटर विभागाचे ६, इलेक्ट्रिकल विभागाचे ४ विद्यार्थी आणि इ. अँड टी. मधील ३ अशा १३ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूवच्या माध्यमातून कंपनीमध्ये निवड झाली आहे. दत्त पॉलिटेक्निकमध्ये झालेल्या पूल कॅम्पसमध्ये या निवडी करण्यात आल्या.
कॉम्प्युटर मधील प्रतीक्षा बांदिवडेकर, वैष्णवी गायकवाड, साक्षी चौगुले, मोबिना जमादार, साक्षी पाटील व गायत्री वास्कर, इ. अँड टी. मधील ऋतुजा केकले, मयुरी पाटील, सृष्टी पाटील व इलेक्ट्रिकल मधील रसिका कांबळे, अनुष्का हिंदोळे, सना जईना आणि अनुराधा कांबळे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
प्रारंभी या कॅम्पसाठी उपस्थित असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे स्वागत संस्थेचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
गणपतराव पाटील म्हणाले, कॉलेजने विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी राज्य, देश व विदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. मोठ्या पॅकेजवर विद्यार्थी अनेक कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. विद्यार्थ्यांची या राष्ट्रीय कंपनीमध्ये झालेली निवड कॉलेजचा लौकिक वाढविणारा आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच सर्व विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासूनच विविध कंपन्यांच्या गरजेनुसार लागणारे सॉफ्ट स्किल, अप्टीट्युड टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यूव, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. अनेक यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शनही आयोजित केले जाते.
यावेळी प्राचार्य प्रेमसागर पाटील, एक्स ऑफिसिओ ट्रस्टी एम. व्ही. पाटील, सेक्रेटरी अशोक शिंदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सचिन शिंदे, ट्रस्टचे डायरेक्टर ए.एम.नानिवडेकर, उपप्राचार्य प्रा. निळकंठ भोळे, तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.