प्रेस मीडिया वृत्तसेवा : शिरोळ प्रतिनिधी:
श्री दत्त आय. टी. आय. दत्तनगर शिरोळ येथे इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आय. टी. आय. प्रवेश फेरी सुरू आहे. फिटर, इलेक्ट्रिशिअन, मेकॅनिक, मोटर व्हेइकल या ट्रेड साठी जागा शिल्लक आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संस्थेची संपर्क साधावा असे आवाहन संस्था चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले आहे.
गणपतराव पाटील पुढे म्हणाले, श्री दत्त आय. टी. आयने यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली असून अनेक विद्यार्थी विविध कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयत्न करते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सहल, व्याख्याने, यशस्वी उद्योजक आणि कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो आणि ते आर्थिक स्वावलंबी बनण्यास मदत होते. ज्या विद्यार्थ्यांनी आय. टी. आय. प्रवेशासाठी अद्यापही फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी नवीन फॉर्म भरण्याची सुविधा संस्थेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहनही संस्थेच्या वतीने गणपतराव पाटील यांनी केले आहे.