प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे मुजवण्याचं काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार गणपती उत्सवात विसर्जन मार्गावरील खड्डे मुरुमाच्या साहाय्याने मुजवले जात आहेत. मनपाक्षेत्रात अनेक रस्ते हे खड्डेमुक्त झाले आहेत. त्यामुळे गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे.
महापालिका क्षेत्रात प्रमुख मार्गावर आणि विशेष करून पाचव्या आणि सातव्या , नवव्या आणि अनंत चतुर्दशी दिवशी गणेश भक्त हे गणपती विसर्जनासाठी नदी पात्राकडे जात असतात. महापालिका प्रशासनाने विसर्जन मार्गावर कुठेही खड्डा राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. तसेच स्वतः मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनीही या कामगिरीवर विशेष लक्ष ठेवले आहे. त्यामुळे विसर्जन मार्गावर एकही खड्डा शिल्लक राहिलेला नाही. सांगली मिरज आणि कुपवाड शहरात 4 टीमद्वारे खड्डे मुरमाने भरले जात असून त्यावर तात्काळ रोलिंग केले जात आहे. यासाठी 30 लोकांची यंत्रणा कार्यरत आहे. महापालिकेच्या टीमकडून काळजीपूर्वक खड्डे मुजवण्यात येत असून यामुळे पाचव्या दिवशी पासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना आता खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही. आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके यांच्यासह शहर अभियंता संजय देसाई , वैभव वाघमारे, आप्पा अलकुडे यांच्यासह सर्व सहायक आयुक्तांची टीम कार्यरत आहे. पाऊस थांबताच याच खड्ड्यांचे डाम्बरी पॅचवर्क केले जाईल अशी माहिती आप्पा अलकुडे यांनी दिली.