प्रेस मीडिया वृत्तसेवा : विजय हुपरीकर
सांगली : सहाय्यक सेवाभावी संस्था व खटाव येथील ग्रामस्थांच्या वतीने उत्पादन शुल्क विभाग सांगली येथे एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.
खटाव तालुका मिरज येथील दलित वस्ती मधील देशी दारूचे दुकान तात्काळ गावाच्या बाहेर स्थलांतरित किंवा बंद करण्याचे निवेदन देण्यात आले होते अखेर अद्यापि दुकान स्थलांतरित झालेले नाही या दुकानामुळे दलित वस्ती मधील महिला मुले मुली यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दारुडे दारू पिऊन रस्त्यात मध्येच उभे राहून मोठमोठ्याने घाण घाण शिवीगाळ करणे भांडणे काढणे घरात व्यसनी व्यक्ती मुळे कुटुंबामध्ये वाद निर्माण होऊन तरुण मुला-मुलींच्या मध्ये व शाळकरी विद्यार्थ्यांच्यामध्ये वाईट अनुकरण करून संस्कृती बिघडत आहे. दुकानामुळे भयंकर त्रास महिला व शाळकरी मुलांना होत असून या सर्वांचा विचार करून साहित्य सेवाभावी संस्था व खटाव ग्रामस्थांनी दारू दुकान गावाबाहेर स्थलांतरित करा अथवा बंद करण्यासाठी एक दिवशी आंदोलन केले आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडे 17 सप्टेंबर 2021 रोजी निवेदन देऊन आठ दिवसाच्या आत मध्ये दलित वस्ती मधील देशी दारूचे दुकान स्थलांतरित न झाल्यास अथवा संस्थेच्या व ग्रामस्थांच्या वतीने कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
अद्यापि उत्पादन शुल्क विभागाकडून दलित वस्ती मधील दारूचे दुकान स्थलांतरित न केल्यामुळे एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या पुढील आठ दिवसांमध्ये खटाव दलित वस्तीतील देशी दारूचे दुकान स्थलांतरित न झाल्यास चक्रिया आंदोलन लोकशाही मार्गाने सहाय्यक सेवाभावी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी असा गंभीर इशारा यावेळी ग्रामस्थांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी परशुराम बनसोडे, संजय कांबळे, रवींद्र कांबळे, रेनॉल्ड कांबळे, वीरा शिंगाडे, जयंत मगरे, ज्योती राजमाने आदी संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.