प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सांगली महापालिकेकडून आस्थापनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. कामगारांच्या कोरोना लसीकरणाची माहिती घेतली जात आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे आणि टीम ही मोहीम राबवीत आहेत.लसीकरण न करता कामावर असल्यास संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेकडून सांगली शहरातील बाजारपेठेतील आस्थापनांची तपासणी सुरू करण्यात येत आहे. बाजारपेठेतील आस्थापनांत काम करणाऱया कामगारांनी कोरोना लसीकरण केले आहे की नाही, याची माहिती घेतली जात आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे आणि टीमकडून बाजारपेठेत तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
उपायुक्त राहुल रोकडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर काळे, वैभव कुदळे, राजू गोंधळे आदींच्या पथकाने शहरातील मेनरोड, कापड पेठ मारुती रोड परिसरातील दुकाने आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांना अचानक भेटी देत त्यांच्याकडे काम करणाऱया कामगारांच्या कोरोना लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी एका दुकानातील कामगाराने लसीकरण केले नव्हते , त्यामुळे त्या आस्थापना धारकाला एक हजाराचा दंड करण्यात आला.