रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन उभे असलेल्या वाहनांवर कारवाई

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पुणे-अहमदनगर या महामार्गावर मागील सहा महिन्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन उभं करणे हे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन उभे असलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.

वाहनाला मागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या महामार्गावर 10 ते 16 सप्टेंबर दरम्यान विशेष मोहिम राबवत सात दिवसात 2 हजार 844 , वाहनांवर करवाई केली आहे,

पुणे ग्रामीण, पुणे विभाग आणि बारामती विभाग पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांच्या वतीने ही कारवाई केली जात आहे. पुणे-सातारा, पुणे- मुंबई जुना व नवीन, पुणे- सोलापूर, पुणे-नाशिक, कल्याण-जबलपुर, पुणे- सासवड सासवड जेजुरी मार्गे धोकादायक स्थितीत उभी असलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. महामार्गावर अपघाताला निमंत्रण देणा-या धोकादायक स्थितीत उभे असणा-या वाहनांवर यापुढे देखील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post