प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : प्रेमसंबंध असताना चारित्र्यावर संशय घेऊन तिचा प्रियकराने पोटात चाकू भोकसून खून केल्याची घटना पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे हद्दीत रविवारी रात्री दहा वाजण्याचे सुमारास घडली. सपना दिलीप पाटील (32-,रा.धनकवडी,पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर राम गिरी (35-,मु.रा.परभणी) यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी रामगिरी हा आचाऱ्याचे काम करतो. सध्या तो राजगुरुनगर येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. पाच ते सहा वर्षापुर्वी तो रिलायंन्स मार्ट शेजारील हॉटेलमध्ये कामाला होता. तेव्हा सपना दुपारच्या सुट्टीमध्ये तेथे जेवायला जात होती. या वेळी दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र मागील पाच ते सहा महिण्यांपासून त्यांच्यात वाद होत होते.
रविवारी रात्री तो मित्राला सोबत घेऊन मित्राच्या आयटेन कारमधून सपनासह जेवायला चालला होता. नव्या कात्रज घाटात बोगद्याजवळ त्यांची गाडी आली असता, त्यांच्यात वाद सुरु झाला. तेव्हा त्याने तीला आणलेला नवीन चाकू रागाच्या भरात तीच्या पोटात खुपसला. यानंतर तो गाडीतून पळून गेला. त्याच्या मित्राने तातडीने रुग्णवाहिकेस फोन करुन बोलावून घेतले. आणि भारती हॉस्पिटल येथे दाखल केले.
याबाबत भारती विद्यापीठ पोलीसांकडे संजीवनी दत्ता देवकर (29) हिने पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. संजीवनी देवकर आणि सपना पाटील या दोघी बहिणी आहेत. त्या रिलायन्स मार्ट मध्ये काम करत होत्या. तसेच धनकवडीतील बालाजीनगर परिसरात राहण्यास आहेत.त्यानंतर आरोपी पसार झाला होता. मोबाईल फोन लोकेशन ट्रेस करून त्याला अटक केली आहे,पुढ़िल तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.