प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी :
कोंढवा : राष्ट्रवादीचे नगरसेविका सौ. नंदा नारायण लोणकर यांनी कौसर बाग येथे दोनच दिवसापूर्वी कोविड लसीकरण केंद्र सुरू केले आहे. आज नगरसेवक नारायण लोणकर यांनी सकाळी लसीकरण केंद्रास भेट दिली. लसीकरण केंद्रामधील चाललेली कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. लसीकरणास नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. शिवाय ऑनलाइन नोंदणी करून सुद्धा जोरात सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या वेळी प्रेस मीडिया चे संपादक मेहबूब सर्जेखान, मुबिन खान व तेथील डॉक्टर्स ,स्टाफ उपस्थित होता.
Tags
Pune