चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मनोरंजन होत आहे.अजित पवारांनी त्यांच्यावर मनोरंजन कर लावावा.......रूपाली चाकणकर



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पुणे : रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ‘चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.’ अशी टीका केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना, देवेंद्र फडणवीस हे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात अशी खिल्ली उडवली होती. चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात बोलताना अजित पवारांवर टीकास्त्र सोडले होते ,त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलीच दखल घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यामुळे महाराष्ट्राचे मनोरंजन होत आहे. त्यामुळे वित्त मंत्री असलेल्या अजित पवारांनी त्यांच्यावर मनोरंजन कर लावावा’ असे ट्विट करीत चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post