पुणे महामेट्रोच्या सर्व स्थानकांना महापुरुषांची नावे द्या ; संभाजी ब्रिगेडची मागणी



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पुणे ७ स्पतेंबर ;पुण्याची व पिंपरी चिंचवड़ ची ओळख जगभर पोहोचली . इथली कर्तुत्वान माती आणि सांस्कृतिक चळवळ समाजासह जगायला अभिप्रेत आहे . त्यामध्ये महामेट्रोची भर पडली आहे . पुण्यात होणाऱ्या महामेट्रो स्टेशनला महापुरुषांची नावे देऊन त्यांचा सन्मान करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे . त्याबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेडनं महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलं आहे . या पत्रात १३ महापुरुषांची नावे ही त्यांच्याकडून सुचवण्यात आली आहेत .

पुणे जिल्ह्याने दोन छत्रपती दिले . मल्हाराव होळकर , राजमाता अहिल्याराणी होळकर , क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले , राजश्री छत्रपती शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , लहुजी वस्ताद साळवे , दिनकरराव जवळकर , केशवराव जेधे , सरसेनापती वीर बाजी पासलकर आदी समाजसुधारकांच्या व महापुरुषांच्या विचारधारेतून हे पुणे नटलेलं आहे . या महापुरुषांचा वैचारिक व वारसा आपण जपला पाहिजे . म्हणून त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी म्हणून वैचारिक ठेवा जपान करण्याचं काम आपण केले पाहिजे असं निवेदनातून नमूद करण्यात आलंय .

*मेट्रो स्टेशनला सुचविण्यात आलेली महापुरुषांची नावे*

  १ ) छत्रपती शिवाजी महाराज २ ) छत्रपती संभाजी महाराज ३ ) मल्हाराव होळकर ४ ) राजमाता अहिल्या राणी होळकर ५ ) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ६ ) राजर्षी छत्रपती महाराज ७ ) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ८ ) लहुजी वस्ताद साळवे ९ ) दिनकरराव जवळकर १० ) केशवराव जेधे ११ ) सरसेनापती वीर बाजी पासलकर १२ ) महादजी शिंदे १३ ) शिवशाहीर अण्णाभाऊ साठे या मागणीचे निवेदन महा मेट्रोच्या गाडगीळ यांना देण्यात आले . यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशसंघटक संतोष शिंदे , शहराध्यक्ष अविनाश मोहिते , विकास शिंदे , उपाध्यक्ष महादेव मातेरे , जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ , सुभाष जाधव , सुनिल जगताप आदी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post