*
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
टोल प्लाझावर टोल भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. पण, याचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणारे सक्रिय झाले असून लोकांना फेक फास्टॅग विकत आहेत. याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने सावधानतेचा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने म्हटले आहे की, काही फसवणूक करणारे सक्रिय झाले असून ते NHAI आणि IHMCL याचा गैरवापर करून फेक फास्टॅग विक्री करत आहेत. फेक फास्टॅग असल्यास टोल प्लाझावरून जाण्यास परवानगी दिली जाणार नाही त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राण्याचा इशारा प्राधिकरणने दिला आहे. असे आढल्यास प्राधिकरणची हेल्पलाईन 1033 किंवा etc.nodal@ihmcl.com यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
फास्टॅग खरेदी करण्यासाठी http://www.ihmcl.co.in किंवा MyFASTag App चा वापर करता येईल. याशिवाय निर्धारित केलेल्या बँक आणि अधिकृत POS एजंट यांच्याकडून फास्टॅग घेता येईल. फास्टॅगसाठी निर्धारित केलेल्या बँकांची यादी IHMCL या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.