अहेले सुन्नत वल जमात शिरूर शहर,ही संस्था ( ट्रस्ट ) या ठिकानी कार्यरत आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : शिरुर मुस्लिम जमात च्या जुन्या ईदगाह व कब्रस्थान च्या जमीनीवर शिरूर नगर परिषद आणि संबंधित ठेकेदार यांनी शासकीय निधीचा अपहार करण्याच्या हेतूने नवीन रायझिंग पाईपलाईन टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुस्लीम समाजाच्या जमिनीवर वहिवाटीस अडथळा निर्माण करून धार्मिक भावना दुखाल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन चे पी आय राऊत साहेब, प्रादेशिक वक्फ अधिकारी खान साहेब, जिल्हाधिकारी राजेश देशमुख , उपविभागीय अधिकारी . संतोष कुमार देशमुख, तसेच शिरूर चे तहसीलदार शेख मॅडम यांना लेखी तक्रार करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष फिरोज भाई सय्यद यांनी केली.
वक्फ अधिनियमाचे उल्लंघन केले,विकास आराखडय़ातील डिपी रोड ऐवजी खाजगी रस्त्यावर पाईपलाईन टाकली, समाजाच्या भावना दुखावल्या,तसेच शासनाच्या निधी चा अपहार केल्या प्रकरणी आयपीसी व प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने मा. संतोष कुमार देशमुख, उपविभागीय अधिकारी पुणे यांनी सय्यद यांच्या तक्रारी ची दखल घेऊन तातडीने कारवाई सुरू केली व शिरूर चे तहसीलदार यांना समक्ष जागेवर जावुन सविस्तर चौकशी करून शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत..ईद गहा व कब्रस्तानच्या जागे वर शिरूर नगर परिषद् अतिक्रमण करत होते त्या वेळी या मस्लिम समाजाच्या जागेवर जी नियोजित संस्था काय झोपा काढ़त होती का ? असा ही प्रश्न निर्माण होत आहे .