प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे. दिनांक 6/ 2/ 2021 रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी/ पिडीत महिला ती जॉब करत असलेली ऑफिस मधून सुटल्यानंतर तिच्या मित्रासोबत नेहमीप्रमाणे विश्रांतवाडी येथे येण्यासाठी निघाले असता फिर्यादीच्या पती व त्याचे दोन गुंड मित्रांनी तिला तसेच तिच्या मित्राला बेदम मारहाण केली फिर्यादीला जबरदस्तीने तिच्या गाडीवर बसवले तसेच फिर्यादीची गाडीची चावी काढून घेतली त्यानंतर फिर्यादीच्या पतीने व त्याच्या मित्राने फिर्यादीला जबरदस्ती कॅम्प पुणे भागात आणले रस्त्या मध्ये आरोपींनी गाडी चालवत असताना मी तुझा बलात्कार करेन तू लय सेक्सी आहे असे बोलून तिचा हात पकडला फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच तिच्या किडनेप करून दादागिरी ने तिला कॅम्प विक्टरी सिनेमा जवळ आणून फिर्यादी ला शिव्या देऊन जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या पीडित महिलेने तिचा पती राहुल भालेराव व पतीचे गुंड मित्र यांच्याविरोधात संबंधित पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तसेच माननीय पोलिस आयुक्त पुणे यांना देखील लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली परंतु पोलिसांनी पीडित महिलेची तक्रारीवर कोणतीही दखल घेतली नाही म्हणून पीडित महिलेने एडवोकेट साजिद शहा तसेच एडवोकेट एच एच खान यांच्यामार्फत मेहरबान खडकी कोर्टात खाजगी फिर्याद दाखल केली. कोर्टाने फिर्यादीच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून विश्रांतवाडी पोलिस स्टेशनला भा द वी कलम 364, 354, 354c, 498A, 323,406,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश केलेले आहे. फिर्यादी तर्फे एडवोकेट साजिद शहा तसेच एडवोकेट एच एच खान हे काम पाहत आहे.....