प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी :
पुणे : कोंढवा कौसरबाग पोलीस चौकी जवळच कचऱ्याचा ढीग जमा झाल्याने दुर्गंधी येत आहे . कोरोना महामारी सुरु असून या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . याकडे या भागातील नगरसेवकांचे लक्ष नसल्याचे दिसून येते. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबतची तक्रार दिनांक १२.०८.२०२१ रोजी महानगर पालिकेत दिली असून या बाबत मनपा कडून टोकण नंबर WA55259 देण्यात आले असून आपल्या कामाची दखल घेतली जाईल असे उत्तर आले आहे. टोकण येऊन दोन दिवस झाले तरी अद्याप कचरा उचलण्यात आलेला नाही. अजून किती दिवस वाट पाहावी लागेल ? असा प्रश्न तेथील नागरिकांतून विचारला जात आहे.