प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवर नजीर शेख :
पुणे : दांडेकर पूल सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस,बोरगाव येथील घटनेच्या निषेध वर धरणे आंदोलन.सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील येथिल बोरगाव मौजे (माळवाडी) येथील मातंग समाजाचे माजी सरपंच दशरथ साठे यांच्या बंधुचे दि.२० ऑगस्ट रात्री २ वाजता निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमी मध्ये घेवून जात असताना तेथील गाव गुंडांनी या रस्त्याने जायचे नाही. हा रस्ता आमच्या मालकीचा आहे असे म्हणुन सदर गावगुंडांनी तीव्र विरोध केला तसेच रस्त्यावर वाहने आडवी लावुन अडथळा निर्माण केला .
त्यावेळी बाचाबाची करून सदर व्यक्तीचे प्रेताची ताटी खाली पडली व प्रेताची हेंडसाळ होवून अवहेलना झाली ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच संबंधीत जातीयवादी गावगुंडांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हनुन मातंग समाजाच्या सर्व संघटना प्रमुख व लहुजी शक्ती सेना* *महाराष्ट्रातील मातंग समाजाची ही मागणी सरकारने पूर्ण करावी अन्यथा या गोष्टीची सरकारला किंमत मोजावी लागेल हे सांगून आंदोलन करण्यात आले .