ट्रस्टचे पदाधिकारी भासवून वक्फ मंडळाचे पावणे आठ कोटी लाटले , वक्फ मंडळ झोपेत

 


अनवरअली नजीर शेख : 

पुणे :  वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करून ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून शासनाकडू बीवीन नुकसान भरपाईची पावणे आठ कोटींची परस्पर लाटल्या  ,  प्रकरणी दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी प्रादेशिक वक्फ बोर्डाच्या अधिकारी खुसरो खान सर्फराज खान ( वय ४ ९ , रा . कोंढवा ) दिलेल्या फिर्यादीनुसार , पोलिसांनी इम्तीयाज महमद हुसेन शेख आणि चाँद रमजान मुलाणी ( दोघे रा . रामनगर , येरवडा ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी- भूसंपादन यांच्याकडे ८ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ दरम्यान घडला

आहे .

 पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार , मुळशी तालुक्यातील माण येथे ताबुत इनाम इंडोमेंट ट्रस्ट या मुस्लीम ट्रस्टच्या मालकीची सुमारे ८ हेक्टर ५७ जागा आहे . संबंधित ट्रस्टची नोंदणी २००१ मध्ये वक्फ बोर्डाकडे आहे . या जमिनीपैकी ५ हेक्टर ५१ आर जमीन शासनाने राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक ४ साठी अधिग्रहण केली . त्या जागेचा मोबदला ९ कोटी ६४ लाख ४२ हजार ५०० रुपये मंजूर झाला होता . ही रक्कम ट्रस्टला  आजून मिळाली नसल्याचे ट्रस्टींनी वक्फ बोर्डाला कळविले . त्यानंतर खान यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार घड़लेला समोर आला . इम्तियाज शेख यांनी ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्टकडे विश्वस्त नियुक्तीसाठी

अर्ज दाखल केला होता . त्यांच्याशिवाय आणखी ३ अर्जी दुसऱ्या विश्वस्तांनी दाखल केले होते . त्यावर अद्यापि निर्णय झालेला नाही . इम्तीयाज शेख व चाँद मुलाणी यांनी आपणच ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे दाखवून तसेच औरंगाबाद येथील राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे बनावट ना हरकत पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले . सरकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून ७ कोटी ७६ लाख ९ ८ हजार २५० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट मिळविला . तो ट्रस्टच्या खात्यावर जमा न करता स्वत : च्या बँक खात्यात जमा करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . हा प्रकार समोर येताच  फिर्यादींनी पोलिसांत तक्रार दाखल केली .

Post a Comment

Previous Post Next Post