अटल बस योजनेअंतर्गत मार्ग क्रमांक के 16 कात्रज ते येवलेवाडी हा नवीन बस मार्ग शनिवारपासून (दि.18) पासुन सुरू करण्यात आला




प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी : 


पुणे : अटल बस योजनेअंतर्गत मार्ग क्रमांक के 16 कात्रज ते येवलेवाडी हा नवीन बसमार्ग शनिवारपासून (दि.18) सुरू करण्यात आला आहे. नगरसेवक वसंत मोरे यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले.अटल बस सेवेअंतर्गत फक्त पाच रुपयांत बस सेवा उपलब्ध होणार आहे. समीर शिंदे यांच्या पाठपुराव्यातून ही बस सेवा सुरू झाली.

यावेळी नितीन कामठे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे हे उपस्थित होते. नगरसेवक वसंत मोरे म्हणाले, 'पीएमपीएमएलने कात्रज व येवलेवाडीला जोडणाऱ्या अंतर्गत मार्गावरून ही नवीन बससेवा सुरू केली आहे. फक्त पाच रुपये एवढ्या किफायतशीर तिकीट दरात सुरू केल्यामुळे या मार्गावरील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.'

असा असेल कात्रज - येवलेवाडी बसचा मार्ग

कात्रज, राजस सोसायटी कॉर्नर, सुंदरबन, गोकुळ नगर, इस्कॉन मंदिर, मेट्रो ग्रीन सोसायटी, विभा कंपनी, आकृती सोसायटी, साई कृष्ण सोसायटी, शिक्षक कॉलनी कामठेनगर, अष्टविनायक कॉलनी, अंतरा सोसायटी, पानसरे नगर, बापूसाहेब शेलार नगर, मनपा शाळा येवलेवाडी, कामठे माध्यमिक विद्यालय, येवलेवाडी असा असणार आहे.अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने मिडी बसद्वारे ही बससेवा पुरविली जाणार आहे. सध्या ही बससेवा दर एक तासाला उपलब्ध असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढवल्या जातील.

Post a Comment

Previous Post Next Post