पुणे : पुण्यात तब्बल 900 रिक्षाचालकांवर पुणे शहर वाहतूक पोलीस आणि विभागीय वाहतूक विभागा कडून कारवाई करण्यात आली . परवाना जवळ न बाळगणे, परवाना बॅजेस न वापरणे आणि पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षांचा वापर याविरोधात ही कारवाई करण्यात आली.पुणे रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना, नियम मोडणारे रिक्षा चालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.अल्पवयीन मुलीवर झालेल्या आत्याराचात एक रिक्षा चालक देखील आरोपी आहे. त्यानंतर पुण्यात कारवाईला वेग देण्यात आला आहे.
या अंनुषंगाने वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आणि विभागीय वाहतूक अधिकारी अजित शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. पुणे वाहतूक पोलिसांनी 740 तर, वाहतूक विभागाने 177 रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे.