प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : पत्नी सोबत भांडण झाल्याने पतीनेच दोघांचे अश्लील फोटो व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केले .या बाबतची अधिक माहिती अशी की, कोंढवा परिसरातील उंढरी भागात संबंधित महिलेचा पती राहतो. 2014 पासून हा प्रकार सुरू होता असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपी पतीने स्वतःचे आणि फिर्यादीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करून स्वताच्या पत्नीची बदनामी केली आहे. त्याने हा प्रकार कशामुळे केला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
पत्नीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने पोलिसात धाव घेत या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी 38 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 33 वर्षाच्या महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.