प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे स्टेशनसमोर फुटपाथला झोपलेल्या ६ वर्षाच्या मुलीला पळवून नेणार्या तिच्यावर अत्याचार करणार्या रिक्षाचालकाला रात्रीत पकडल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी अशीच एक कामगिरी केली आहे.ससून रुग्णालयातउपचारासाठी आलेल्या महिलेकडील एका ३ महिन्याच्या मुलीला परिचारिकेचा गणवेश घालणाऱ्या महिलेने पळवून नेले होते. तिचाही मार्ग काढत खराडी रोडपर्यंत पाठलाग करुन पकडण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. या महिलेला अटक करुन मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
वंदना मल्हारी जेठे (वय २४, रा. थिटे वस्ती, खराडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कासेवाडी येथे राहणार्या एका २२ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या ३ महिन्याच्या मुलीला घेऊन गुरुवारी ससून रुग्णालयात आल्या होत्या. ससूनमधील वॉर्ड क्रमांक ७४ मध्ये त्या थांबल्या होत्या. यावेळी एक परिचारिकेसारखा गणवेश घातलेली महिला तिच्याकडे आली. तिने या फिर्यादी महिलेला तुमच्या नातेवाईकांनी बोलावले आहे, असे सांगितले.तुम्ही जा मी बाळाला सांभाळते, असे सांगितले. ती परिचारिका असल्याचे समजून या महिलेला आपल्या ३महिन्यांच्या मुलीला तिच्याकडे दिले. त्या नातेवाईकांना पहायला गेल्या.तेथून परत आल्या तर ती परिचारिका व तिची मुलगी जागेवर नसल्याचे आढळून आली. या महिलेने तातडीने ससून रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना ही बाब सांगितली.
पोलिसांनी खराडी रोडला या रिक्षाचा पाठलाग करुन तिला पकडले व मुलीची सुखरुप सुटका केली.