गणेशोत्सव विसर्जनासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्ते रविवारी वाहतुकीसाठी बंद , पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले



प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी : 

 पुणे - गणेशोत्सव विसर्जनासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्ते रविवारी वाहतुकी साठी बंद राहणार आहे. वाहन चालकांची  गैरसोय होऊ नये या साठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे  वाहतुक पोलिसांनी आवाहन केले आहे.कोरोनाच्या पार्श्‍वभुमी वरील होत असलेला गणेशोत्सव आत्तापर्यंत शांतते पार पडला आहे. रविवारी विसर्जन असल्याने पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसार विसर्जन मिरवणुक होणार नाही. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन जागेवरील हौदात किंवा महापालिकेच्या फिरत्या हौदात करावे लागणार आहे.

मध्यवर्ती भागात मानाचे व प्रमुख गणेशोत्सव मंडळे असल्याने नागरीकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून ते प्रमुख व मानाच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत रस्ते बंद असतील.

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता 

शिवाजीनगरहून स्वारगेटला जाणारा शिवाजी रस्ता स.गो.बर्वे चौकातुन वाहतुकीसाठी बंद असेल. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स्वारगेट व इच्छित स्थळी जावे.

 बाजीराव रस्ता 

स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणाऱ्या बाजीराव रस्त्यावरील वाहतुक पुरम चौक येथे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी स्वारगेट, सारसबाग, पुरम चौक, टिळक रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर किंवा इच्छित स्थळी जावे.

लक्ष्मी रस्ता, केळकर, कुमठेकर रस्ताही वाहतुकीसाठी बंद 

शहराच्या उपनगरांमधून येणाऱ्या नागकांसाठी मध्यवर्ती भागात जाण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या या तिन्ही रस्त्यांवरील वाहतुक रविवारी बंद असेल. टिळक चौकातुनच तिन्ही रस्त्यांवर जाणारी वाहतुक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.

अंतर्गत रस्तेही बंद 

 नागरीकांची व वाहनांची रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी अप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे जाणाऱ्या रस्ता बंद करण्यात येणार आहे. याच पद्धतीने महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, बेलबाग चौक, शनिवारवाडा या ठिकाणी जाणारे अंतर्गत रस्तेही बॅरीकेडस्‌ टाकून बंद केले जाणार आहेत.

'गणेशोत्सव विसर्जनासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते रविवारी सकाळपासूनच बंद करण्यात येणार आहेत. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनीही मध्यवर्ती भागात न येता पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जावे.' - राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा.

Post a Comment

Previous Post Next Post