विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त .



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सकाळी दहा वाजल्यापासूनच मंडपातच विसर्जन होणार आहे. नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर न पडता विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, असे आवाहान पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलंय.उद्या सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात होणार आहे. नागरिकांना विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे.

असा असेल विसर्जनासाठीचा बंदोबस्त

गृहरक्षक दल जवान – 450

दंगल नियंत्रण पथके – 10

राज्य राखीव पोलिस दल – 10 प्लाटुन

बॉम्ब शोधक व नाशक पथके – 08

शीघ्र कृती दल पथके – 16

मुख्यालयाकडून पोलिस ठाण्यासाठीचे मनुष्यबळ – 1100

गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके – 20

पोलिस मुख्यालयातील राखीव तुकड्या – 05

पोलिस ठाण्यांकडील पोलिस मित्र – 1 हजार

वज्र, लिमा, वरूण यांचा राखीव बंदोबस्त

Post a Comment

Previous Post Next Post