प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी :
पुणे : लसीकरणासाठी नागरिक आटोकाट प्रयत्न करत असताना उपलब्ध असलेल्या लसी देण्यासाठी पुणे महानगरपालिका लस टोचण्यासाठी लागणारी सुई पुरवण्यात अपयशी ठरली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष या नंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडून पूर्वसूचने शिवाय सुईचा पुरवठा बंद झाला असा पलटवार केला आहे. तसेच तातडीने सुई खरेदी करुन पुण्यातील लसीकरण सुरळीत केल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, लसीकरण सुरु झाल्यापासून डोस सोबत सुईचाही पुरवठा होत होता.मात्र राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच सुईचा पुरवठा बंद झाला.शिवाय ही सुई खुल्या बाजारात उपलब्ध नाही. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे लसीकरणावर झाला.लसीकरण बंद राहू नये म्हणून तातडीने 1 लाख पर्यायी सुई खरेदी केल्याने लसीकरण सुरळीत झाले आहे.कोरोना विरुद्धच्या लढ्यात पुणे महापालिकेने दोन्ही लाटांचा आजवर सक्षमपणे सामना करत सर्व यंत्रणा उभ्या केल्या. हे पुणेकर जाणतात, असा टोला त्यांनी लगावला.
काय म्हणाले प्रशांत जगताप ?
लसीकरणासाठी नागरिक आटोकाट प्रयत्न करत असताना उपलब्ध असलेल्या लसी देण्यासाठी पुणे महानगरपालिका लस टोचण्यासाठी लागणाऱ्या सुई पुरवण्यात अपयशी ठरली आहे.
तब्बल 8,500 हजार कोटी रुपयांचे बजेट असणारी पुणे महानगरपालिका आपल्या नागरिकांना लस देण्यासाठी सध्या सुई पुरवू शकत नाही ही फार मोठी शोकांतिका असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.