अपघात वृत्त : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; चालक ठार.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर हा अपघात सोमवारी (दि. 27) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झाला. एक ट्रक कागदांचे रीळ भरून जात होता. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रकमधील रीळ मागच्या बाजूला खाली पडले. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला.

ट्रकमधील रीळ मागून येणाऱ्या एका कारवर पडले. अवजड रीळ कारवर पडल्याने कार अक्षरशा  चपटी झाली. या अपघातात कारमधील चालकाचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

Previous Post Next Post