प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : हिंजेवाडी माण येथील राजीव गांधी इन्फोटेक साठी अधिग्रहण करण्यात आलेल्या जमीनीच्या मोबदला संदर्भातील गैरव्यवहारातील एक आरोपी चांद रमजान शेख याचा जामीन अर्ज पुणे येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
सुमारे 9 कोटी 64 लाख रुपये मोबदला मिळणार असलेल्या वक्फ संस्थेचे ट्रस्टी असल्याचे खोटे सांगून तसेच पुराव्या दाखल वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत पत्र सादर करणाऱ्या आणि त्यापैकी सुमारे 8 कोटींपेक्षा अधिक रक्कम परस्पर हस्तांतरित करणाऱ्या इम्तियाज शेख तसेच चांद मुलाणी तसेच इतर या आरोपीं पैकी चांद मुलाणी याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतांना वक्फ मंडळाला या कामी तक्रार करण्याचा हक्कच नसल्याने जामीन व्हावा असा बचाव घेतला होता.
न्यायालयाने त्याचे म्हणणे फेटाळून लावत सरकारी वकील ऍड. गेहलोत व मूळ फिर्यादी असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे विशेष वकील ऍड. समीर शेख यांचे म्हणणे मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
यातील सुमारे 90% पेक्षा अधिक रक्कम रक्कम बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री यशवंत गवारी व त्यांच्या टीम मधील अधिकारी व पोलिसांनी आतापर्यंत वसुल करून बँकेत जमा केल्याने पोलिसांचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे. सदर घोटाळा हा मोठ्या स्वरूपाचा घोटाळा असल्याची चर्चा असून या मागचे मोठे धेंड बाहेर आले पाहीजे अशी मागणी जनतेतून होत आहे.