प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये एका 70 वर्षाच्या नराधमाने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागिराविरुद्ध गुन्हा) दाखल केला आहे.
शाकील इस्माईल शेख (वय-70) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भादवि 509, 506 अंतर्गत शाकील शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.11) सकाळी 10.15 आणि रविवारी सकाळी 11.15 वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शकील याने पिडीत तरुणीकडे शरिरसुखाची मागणी केली.तरुणीने त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने तरुणीला आयुष्यातून उठवून टाकण्याची धमकी दिली.पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.