प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे स्टेशन येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणानंतर प्रशासनाकडून रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र या कारवाईत अवैद्य रिक्षा चालकांसह वैध रिक्षा चालकांवर देखील कारवाई होत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अवैध रिक्षा चालकांवर कारवाई करा, वैध रिक्षाचालकांवर नको, अशी मागणी करत पुणे आरटीओ कार्यालयावर रिक्षाचालकांनी बुधवारी धडक मोर्चा काढला. अवैध रिक्षा चालकांवर कारवाई करताना प्रशानाने वैध आणि अवैध यातील फरक जाणून कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली.
या बाबतचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांना देण्यात आले.