प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे :पुणे पालिकेच्या प्रभागामध्ये क्षेत्र सभेसाठी,अनधिकृत बांधकाम-शहर विद्रुपीकरणाविरुद्ध इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान हे 21 सप्टेंबर पासून पुणे मनपा येथे आमरण उपोषण करणार आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून विविध नागरी सुविधासाठी,नागरिकांचा प्रशासकिय कारभारात समावेश करण्यात यावा,क्षेत्रसभा न घेतलेल्या दोषी नगरसेवक (प्रभाग क्रमांक 27) अनुक्रमे अ ब क ड यांना बडतर्फ करण्यात यावे,संकल्पना फलकावर व शहरविद्रपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करावी,पुणे महानगरपालीकेचा महसूल बुडविणाऱ्या नगरसेवकावर गुन्हे दाखल करणे,अनधिकृत बांधकाम यावर कारवाई,निवेदेचे स्पष्टीकरण इत्यादी विषयावर ठोस कारवाई करावी या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.
कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन व अवमान करणाऱ्या पुणे मनपा अधिकार्यावर कारवाई करण्यासंदर्भात इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप,क्षेत्रसभा समर्थन मंच,एनएपीएम(जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय).राष्ट् सेवा दल,संविधान बचाव समिती व इतर सामाजिक संस्था यांच्या पाठिंब्याने करण्यात येणार असल्याचे असलम इसाक बागवान यांनी सांगितले.या आशयाचे पत्र पुणे मनपा व शिवाजीनगर पोलिस ठाणे यांना देण्यात आले आहे.
याच विषयावर आंदोलन,स्मरण आंदोलन,ठिय्या आंदोलन करूनही पुणे मनपा आयुक्त व संबंधित यावर कुठलेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने हे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.