प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे :पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आली आहे.परिसरात नागरिक अक्रोश व्यक्त करत आहे पुणे रेल्वे स्टेशन व परिसर मधे वावराताना महिलांना भय निर्माण होत आहे,तरी या सर्व आरोपींनी कठोर शिक्षा व्हावी अशी आशा वेक्त केली जात आहे
एकूण 7 आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आणि हा प्रकार काल उघडकीस आला आहे. त्यानंतर वानवडी पोलीसांनी तात्काळ या आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे. तर या आरोपींमध्ये त्यावेळी दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त समोर आले आहे. तर, इतर आरोपी हे रिक्षा चालक आहेत. दरम्यान, त्यांना या लाजिरवाण्या दुष्कृत्यात सहाय्य करणाऱ्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.