प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे शहर दि १०सप्तेंबर : दोन वर्षांच्या चुमकल्यासह एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची अतिशय दुःख दायक घटना शहरात पुणे-सोलापूर रस्त्यालगत असलेल्या म्हातोबाची आळंदी परिसरात घडली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
परिसरातील विहिरीतील पाण्यात एक महिला आणि मुलाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात तरंगणारा मृतदेह कविता आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा असल्याची खात्री पोलिसांनी पटवली.
कविता देवीदास भोसले वय ३०, सध्या रा. भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. उमरगा, जि. उस्मानाबाद आणि दोन वर्षांचा मुलगा प्रसन्नराज वय. 2 अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.कविताने मुलासह आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही