प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : वानवडी क्षेत्रीय कार्यालय येथे निकृष्ठ दर्जाचे कार्य करणार्या पुणे महानगरपालीक वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देण्याची गांधीगिरी करुन निषेध करण्यात आला.
सह उप आयुक्त, प्रभारी उप आयुक्त आरोग्य विभाग, अभियंता विभाग आकाशचिन्ह विभाग, बारनिशी येथील विविध अभियंते अधिकारी, कर्मचारी यांना महात्मा गांधी यांच्या अहिंसक मार्गाने गुलाबाचे पुष्प देवून निकृष्ठ कार्याची निषेध पावती सामाजिक कार्यकर्त्यानी दिली ! 6 सप्टेंबर रोजी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप यांनी केलेल्या गांधीगिरीमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची पळापळ झाली !
असलम बागवान म्हणाले, 'आमच्या नागरी समस्येच्या 15 मागण्या होत्या. त्यात स्वच्छता, रस्त्यावरील खड्डे, पथारी हाथगाडी वाले यांचे पुनर्वसन, दोषी नगरसेवक गफूर पठाण यांच्यावर पुणे मनपा चा महसूल बुडविल्या बद्दल आणि 3 करोड रुपयांची विजचोरी संदर्भात गुन्हा दाखल करण्यास राजकिय हेतुने टाळा टाळ प्रकरणात कारवाई व्हावी,या मागण्यांचा समावेश होता.
या गांधीगिरीच्या कारणांचे निवेदन वानवडी क्षेत्रीय कार्यालयचे साहय्यक उप आयुक्त तारू यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे आयोजन इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी केले. तर मार्गदर्शन इब्राहिम खान यांनी केले. यावेळी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राजू सय्यद, राज फैय्याज, आमिन दार, इमरान घोडके, सूरज कांबळे, निखिल जाधव, विकास वानखडे, सहिद शेख तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, विजय भाऊ, बबलू सय्यद उपस्थित होते.